Live Updates
13:03 (IST) 12 Jan 2017
मुंबई-अहमदाबाद मार्गावर खानिवडे टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा; दोन हजाराचे सुट्टे नसल्याने टोलनाक्यावर गर्दी
12:48 (IST) 12 Jan 2017
डोंबिवली स्थानकातील नागरिकांच्या रेल-रोकोमुळे वाहतूक ठप्प
12:35 (IST) 12 Jan 2017
डोंबिवली स्टेशनवर नागरिकांचा रेलरोको, स्टेशनजवळील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असल्याने रेलरोको
12:19 (IST) 12 Jan 2017
सरकारच्या धोरणांमुळे भाजपला नगरपालिका निवडणुकांमध्ये यश, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत थोपटली कार्यकर्त्यांची पाठ
12:18 (IST) 12 Jan 2017
सरकारच्या धोरणांमुळे नगरपालिका निवडणुकांत यश: रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
12:15 (IST) 12 Jan 2017
ठाण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे भाषण सुरू
12:02 (IST) 12 Jan 2017
जलिकट्टूवर बंदी कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय देण्यास नकार
11:57 (IST) 12 Jan 2017
छत्तीसगडमध्ये राज्य योग आयोगाची स्थापना, एक एप्रिलपासून कामास सुरूवात
11:47 (IST) 12 Jan 2017
पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी केली काका-पुतण्याची हत्या
11:29 (IST) 12 Jan 2017
पंजाब निवडणुकीसाठी भाजपने १७ उमेदवारांची नावे केली जाहीर
10:07 (IST) 12 Jan 2017
नजरचुकीने पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण यांची लवकरच सुटका होणार
10:06 (IST) 12 Jan 2017
पिंपरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकावर गुन्हा दाखल
10:03 (IST) 12 Jan 2017
लष्करी अधिकारीच धान्याची विक्री करतात; लष्करी तळाजवळील रहिवाशांचा दावा
09:29 (IST) 12 Jan 2017
पालघरमध्ये भीषण आग, दोन घरे जळून खाक, दोन महिलांचा मृत्यू-टीव्ही वृत्त
09:21 (IST) 12 Jan 2017
भारतीन नौदलामध्ये ‘खांदेरी’चा समावेश, मुंबईतील कार्यक्रमात पाणबुडीचे जलावतरण
09:17 (IST) 12 Jan 2017
बीएसएफनंतर सीआरपीएफच्या जवानाने पोस्ट केला व्हिडीओ; सुविधा मिळत नसल्याची मांडली व्यथा
07:43 (IST) 12 Jan 2017
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पत्रकारांना पाहताच पळ काढला
04:03 (IST) 12 Jan 2017
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक रखडले
03:22 (IST) 12 Jan 2017
कर्णधार म्हणून देशाला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न – कोहली
02:57 (IST) 12 Jan 2017
नोटाबंदीचे आणखी वाईट परिणाम समोर – मनमोहन सिंग
01:56 (IST) 12 Jan 2017
मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडीला काँग्रेसचा ठाम नकार
21:54 (IST) 11 Jan 2017
ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्सजवळ पीएमपीएमएलच्या बसला आग; अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल, बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले
21:26 (IST) 11 Jan 2017
पुण्यात गणेशखिंड रस्त्यावर भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
21:12 (IST) 11 Jan 2017
लातूरच्या किल्लारी गावाला भूकंपाचा सौम्य धक्का; ८ वाजून ३९ मिनिटांनी जाणवले धक्के
21:12 (IST) 11 Jan 2017
दिवा- रोहा पॅसेंजर उशीरा आल्याने प्रवाशी संतप्त
21:12 (IST) 11 Jan 2017
मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात प्रवाशांचे आंदोलन
20:40 (IST) 11 Jan 2017
अॅमेझॉनने माफी न मागितल्यास कंपनीच्या एकाही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा देणार नाही- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज
20:40 (IST) 11 Jan 2017
अॅमेझॉनने भारताची बिनशर्त माफी मागितली पाहिजे- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज
20:40 (IST) 11 Jan 2017
अॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या उत्पादनांची विक्री बंद करावी- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज
20:35 (IST) 11 Jan 2017
पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजीक भारतीय लष्कराबरोबरच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार