X
X

EXIT POLL: हरियाणात भाजपाला स्पष्ट बहुमत!

READ IN APP

एकूण ९० पैकी सरासरी ६३ जागा मिळण्याचा अंदाज

महाराष्ट्राबरोबरच आज हरियाणा विधानसभेसाठी देखील मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ९० जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताचा आकडा ४६ आहे. तर, विविध एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपाला सरासरी ६३ जागा मिळणार असल्याचे दिसून आले आहे.

रिपब्लिकन जन की बातच्या पोलनुसार भाजपाला ५२ ते ६३ जागा तर काँग्रेसला १५ ते १९ जागा मिळणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर दुष्यंत चौटाला यांच्या ‘जेजेपी’ पक्षाला ५ ते ९ जागा मिळू शकतात.याशिवाय अन्य पक्षांना ७ ते ९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एबीपी एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये भाजपाला ७२ जागा मिळणार आहेत, तर काँग्रेसला अवघ्या ८ जागी यश येणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचबरोबर अन्य उमेदवार दहा ठिकाणी असू शकतील असे सांगण्यात आले आहे.

सीएनएन- न्यूज 18 इप्सोस एक्झिट पोलनुसार भाजपाला ९० पैकी ७५ जागी यश येणार आहे. तर काँग्रेसला १५ जागा मिळणार आहेत.
हरियाणातील ९० जागांसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले. एकूण ६१.६२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. तर १ हजार १६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

20
X