लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यांतील ६ विधानसभा मतदारसंघांचा मिळून झालेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील १ हजार ९७१पकी १३० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. यातील ५ मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. या सर्व केंद्रांवर प्रशासन करडी नजर ठेवून आहे. या केंद्रांवर निर्धोक वातावरणात मतदान पार पडावे, या साठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद मतदारसंघात औसा व निलंगा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एकूण १७ लाख ७ हजार ६५९ मतदारांसाठी १ हजार ९७१ मतदान केंद्रे निर्माण केली आहेत. यातील १२५ केंद्रे संवेदनशील, तर ५ अतिसंवेदनशील आहेत. अतिसंवेदनशील असलेली सर्व मतदान केंद्रे बार्शीतील आहेत. सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांकडून तसा अहवाल प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
उस्मानाबाद पोलीस अधीक्षकांनीही संवेदनशील केंद्रांचा अहवाल सादर केला. लातूर पोलीस विभागाचा अहवाल येणे बाकी आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकत्रित सर्व संवेदनशील मतदान केंद्रांचा आढावा घेतला जाईल, असेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2014 रोजी प्रकाशित
उस्मानाबादेत १२५ मतदान केंद्रे संवेदनशील, ५ अतिसंवेदनशील
लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यांतील ६ विधानसभा मतदारसंघांचा मिळून झालेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील १ हजार ९७१पकी १३० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.
First published on: 25-03-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 125 voting centre sensitive in osmanabad