हिंगोली – फरशीने भरलेल्या रस्त्यात उभ्या मालमोटरीवर  मेंढ्यांची वाहतूक करणारी दुसरी मालमोटार जाऊन धडकली. या अपघातात चार व्यक्ती ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. तसेच 190 मेंढ्यांही मृत्यूमुखी पडल्या. जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगाव नजीक हा अपघात गुरुवारी सकाळी घडला. घटनास्थळी पोलीस पोहोचले. मदत कार्यासाठी जेसीबी आणून वाहतूक सुरळीत करण्यात आली.