मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्‍या एका खासगी बसला बावधन येथील रस्त्यावर अपघात झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये ५ प्रवासी जखमी झाले असून, या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने परी शर्मा ट्रॅव्हल KA ५१ AC १४४७ या क्रमांकाच्या खासगी बसने ३६ प्रवाशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी चालकाचं गाडीवरील अचानक नियंत्रण सुटल्याने ती बस सर्व्हिस रोडवर पलटी झाल्याची घटना घडली.

या घटनेमध्ये पाच प्रवासी जखमी झाले आहेत. त्या सर्वांना तत्काळ जवळील रूग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आहे. तसेच, या अपघाताच्या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली असून, सर्व्हिस रोडवरील बस बाजूला करण्याचं काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A private bus mumbai to bangalore accident bavadhan five passengers were injured svk 88 ysh