Bacchu Kadu : ई-रिक्षा वाटपानंतर त्या तत्काळ नादुरुस्त झाल्याने बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीतून त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. पहिल्याच दिवशी ई-रिक्षा बंद पडल्याने बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. राज्यात इ-रिक्षाचे वाटप करण्यात आले आहे. परंतु, पहिल्याच दिवशी या इ रिक्षा बंद पडल्याची तक्रार बच्चू कडूंना प्राप्त झाली. संभाजीनगरमधील गेस्ट हाऊसमध्ये काही जणांनी बच्चू कडूंकडे ही तक्रार केली. त्यावेळी तिथे काही अधिकारीही उपस्थित होते. तक्रारदार त्यांचे प्रश्न मांडत असतानाच बच्चू कडूंनी त्यांच्या कानशिलात लगावली. बातमी अपडेट होत आहे