असंख्य माता भगिनी आणि शिवसनिकांनी लक्षवेधी शोभायात्रा काढून भगव्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीला साकडे घातले. िहदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ५० वष्रे पूर्ण झाली. भगवा आजही दिमाखात राज्यभूमीवर फडकतोय. हाच भगवा आता महापालिकेवरही फडकू दे ग आई.., अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांला सुरुवात झाली आहे. सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाची सुरुवात दिमाखादार अशा शोभायात्रेने झाली. उद्घाटन सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार राजेश क्षीरसागर, भगिनी मंचच्या वैशाली क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि असंख्य शिवसनिकांच्या साक्षीने झाले.
ऐतिहासिक िबदू चौकातून शोभायात्रेस सुरुवात झाली. पावसाच्या सरीतही असंख्य शिवसनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रणवाद्यांच्या धामधुमीत आणि भगवे फेटे परिधान केलेल्या माता भगिनींच्या अतिव उत्साहात रॅली पार पडली. रॅलीची सांगता अंबाबाईला साकडे घालून झाल्यावर झाली.
शिवाजी महाराज,  शाहू, फुले, आंबेडकर, बाळासाहेब ठाकरें यांच्या वेशातील कार्यकर्त्यांनी सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. त्याचप्रमाणे बाळासाहेबांच्या डिजिटल फलकाने महापालिकेजवळील वाघाचा फलकही लक्षवेधी ठरला. या शोभायात्रेत भगव्या साडय़ा परिधान केलेल्या, भगवे फेटे आणि हातात भगवा झेंडा घेऊन असंख्य महिला कार्यकर्त्यांनी घेतलेला सहभाग लक्षणीय होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beg to mahalaxmi in first ochre week