कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने धडाकेबाज यश मिळवल्यानंतर आता मंत्रिपदाबरोबरीने पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांमध्ये जोरदार चुरस दिसत आहे.