डॉ. भालचंद्र मुणगेकर सोलापुरात रुग्णालयात दाखल प्रतिनिधी, सोलापूर सोलापूर विद्यपीठाच्या अकराव्या पदवीदान सोहळ्यासाठी आलेले मुंबई विद्यपीठाचे माजी कुलगुरू तथा राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना शुवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागले आणि हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना तातडीने सोलापूरच्या अष्टिद्धr(२२८)नी सहकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयाच्या सूत्रांनी रात्री सांगितले. डॉ.मुणगेकर हे सोलापूर विद्यपीठाच्या पदवीदान सोहळ्यानंतर सायंकाळी भाई छन्नुसिंग चंदेले स्मृती केंद्राने आयोजिलेल्या कार्यमात व्याख्यान देणार होते. परंतु कार्यRमापूर्वीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तात्काळ अष्टिद्धr(२२८)नी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा रक्तदाब आणि शरीरातील साखर वाढल्याचे तसेच हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे आढळून आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गुरूनाथ परळे हे डॉ. मुणगेकर यांच्यावर उपचार करीत आहेत. रात्री त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2016 रोजी प्रकाशित
भालचंद्र मुणगेकर रुग्णालयात
रात्री त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 13-02-2016 at 00:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhalchandra mungekar admit in hospital