मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री विद्यार्थ्यांची बस उलटली आहे. संबंधित बस ४८ जणांना घेऊन लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेनं जात होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून घाट उतरत असताना ही बस उलटली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संबंधित सर्व विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली आणि आजुबाजुच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे विद्यार्थी लोणावळ्यातील एका जल क्रीडा केंद्रात (वॉटर पार्क) सहलीसाठी रविवारी आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी रात्री लक्झरी बस क्रमांक एमएच ०४ जीपी २२०४ ही बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात होती. या बसमधून चेंबूर येथील मयांक कोचिंग क्लासेसचे दहावीच्या वर्गातील एकूण ४८ विद्यार्थी प्रवास करत होते. कोचिंग क्लासचे दोन शिक्षकही बसमध्ये होती. ही बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चेंबूरच्या दिशेनं जात होती. यावेळी घाट उतरत असताना रात्री आठच्या सुमारास मॅजिक पॉईंटजवळ ही बस डाव्या बाजूला उलटली.

या अपघातात जवळपास सर्व विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली व आजुबाजूच्या परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेच एक मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त बसला बाजूला घेण्यात आलं असून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus accident carrying 48 students mumbai pune high way two died rmm