नगर : शहरातील करोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र अद्याप प्रादुर्भाव कायम आहे. आज, रविवारी २८८२ नवे रुग्ण आढळले तर ३२९६ रुग्ण करोनामुक्त झाले. उपचार सुरू असलेल्या ३१ रुग्णांचा मृत्यू झाला.

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७ हजार १३८ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८९.४२ टक्के झाले आहे. आज रुग्णसंख्येत २८८२ ने वाढ झाल्याने उपचारार्थी  रुग्णांची संख्या आता २२ हजार १६ झाली आहे.

आज आढळलेले बाधित पुढीलप्रमाणे— संगमनेर ३१०, नगर तालुका २७०, कर्जत २०९, श्रीगोंदे १९०, नेवासे १८८, शेवगाव १८८, राहुरी १७८, नगर शहर १७४, श्रीरामपूर १६८, पाथर्डी १६५, अकोले १६४, राहता १६२, पारनेर १६०, कोपरगाव १५४, जामखेड १४२, इतर जिल्ह्यतील ४७, भिंगार १२ व राज्याबाहेरील १.

आज करोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे—मनपा ४१९, अकोले ५३, जामखेड २७५, कर्जत १०९,  कोपरगाव १२८, नगर तालुका ३३७, नेवासा २१२, पारनेर १९५, पाथर्डी १६८, राहाता २९५, राहुरी १७१, संगमनेर १९०, शेवगाव ३२१,  श्रीगोंदा १६६,  श्रीरामपूर १६४, भिंगार २५, इतर जिल्हा ६४ आणि इतर राज्य ४.

जिल्ह्यची आकडेवारी

बरे झालेले रुग्ण : २,०७,१३८

उपचार सुरू असलेले रूग्ण : २२०१६

मृत्यू : २४८१

एकूण रूग्ण -२,३१,६३५