तब्बल २० लाख रुपयांची लाच घेताना कोकण विभागातील पोलीस उपअधीक्षकाला सोमवारी रात्री उशीरा रंगेहाथ पकडण्यात आले. विठ्ठल जाधव असे या अधीक्षकाचे नाव आहे.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून सिंधुदुर्गमधील एका हॉटेलात जाधव यांना रंगेहाथ पकडले. कल्याणमधील न्यायालयात माळवणकर यांच्या बहिण आणि भावाविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात तडजोड करण्यासाठी जाधव यांनी त्यांच्याकडे २० लाख रुपयांची लाच मागितली होती. लाच दिल्यास संबंधित खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड करून देईन, असे आश्वासनही जाधव यांनी माळवणकर यांना दिले होते.
रंगेहाथ पकडल्यानंतर जाधव यांच्याविरोधात भ्रष्टाचार निर्मुलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2014 रोजी प्रकाशित
पोलीस उपअधीक्षकाला २० लाखांची लाच घेताना अटक
तब्बल २० लाख रुपयांची लाच घेताना कोकण विभागातील पोलीस उपअधीक्षकाला सोमवारी रात्री उशीरा रंगेहाथ पकडण्यात आले.

First published on: 04-03-2014 at 02:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dysp in acb net for taking bribe