सलग तीन वर्षांपासून पावसाअभावी शेती उत्पादनाला मोठा फटका बसल्याने शेतीवर अवलंबून असलेली बाजारपेठ पूर्ण कोलमडली आहे. शेतातील पीक बाजारात न आल्याने शेतकऱ्यांच्या हातात पसा नाही. परिणामी कापड दुकानापासून ते सराफाच्या पेठेपर्यंत शुकशुकाट निर्माण झाला आहे. यंदा सोन्याचा भाव ५ हजारा रुपयांनी उतरला तरी ग्राहक नाही. शेतीपूरक छोटे-मोठे व्यवसाय तर पूर्ण बंद पडल्याने अनेकांवर बेकारीच ओढवली आहे. व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली असली, तरी दुकानात ग्राहक नसल्याने व्यापारीही संभ्रमात आहेत. एकूणच जिल्ह्याचे अर्थकारणाचे चक्र मंदावले आहे.
जिल्ह्यात आधुनिक दळणवळणाच्या सुविधा नसल्याने मोठय़ा उद्योगधंद्यांची वाणवा आहे. शेती उत्पादनावरच प्रामुख्याने जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. ऊस व कापूस पिकांमुळे साखर कारखानदारी, जििनग प्रेसिंग उद्योग आघाडीवर आहे. राज्यात सर्वाधिक कापूस व ऊसउत्पादन होत असल्याने इतर राज्यांतील व्यापाऱ्यांनी कापूस उद्योगात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली. गेवराई, माजलगाव व वडवणी या तीन तालुक्यांत जििनग प्रेसिंगचे उद्योग मोठय़ा प्रमाणात चालतात. कोटय़वधीची उलाढाल असलेल्या या उद्योगाला मागील वर्षी पूर्ण घरघर लागली. पावसाअभावी कापसाचे केवळ २५ टक्केच उत्पादन झाल्याने जििनग व्यापाऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले. उसाचे क्षेत्रही घटल्याने अनेक कारखान्यांना गळीत हंगाम बंद ठेवावा लागला. परिणामी शेतकऱ्यांच्या हातात एकरकमी पसा देणारा ऊस व कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांबरोबर या व्यवसायावर अवलंबून असणारे उद्योगही अडचणीत सापडले.
महाराष्ट्रातून ऊसतोडणी मजुराच्या माध्यमातून जिल्ह्यात येणारा मोठय़ा प्रमाणावरील पसाही यावर्षी आला नाही. यंदा जून महिन्यात पाऊस वेळेवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज व उसनवारी करून खरिपाची पेरणी केली. मात्र, दीड महिन्यापासून पाऊस गायब झाल्याने पेरलेले बियाणे वाया गेले. भीषण दुष्काळ उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. सलग चौथ्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतीवर अवलंबून सर्व उद्योगधंदे अडचणीच्या दुष्टचक्रात सापडले आहेत. शहरातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी मोठी गुंतवणूक करून आणलेला माल खरेदीस ग्राहकच नाही. कपडय़ाच्या बाजारपेठा कायम गजबजलेल्या असतात. मात्र, महिनाभरापासून या बाजारपेठेतही ग्राहक कमी झाला आहे.
सोन्याचा भाव ३१ हजारवरून २४ हजारांपर्यंत घसरला. मात्र, सराफपेठेतही ग्राहकाअभावी शुकशुकाट आहे. शेतीत पिकलं नाही तर बाजारात येत नसल्याने सर्वच व्यवहार ठप्प होतात. आठवडी बाजारातही तुरळक ग्राहक असून पावसाअभावी निर्माण झालेल्या चाराटंचाईमुळे जनावरांच्या बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी जनावरे आली असली, तरी जनावरांनाही खरेदीदार नाही.
पावसाअभावी कपडा खरेदीकडे ग्राहकांचा ओढा निम्म्याने कमी झाला आहे. सेल लावून ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिल्यामुळे थोडा-फार ग्राहक दिसतो अन्यथा कपडा खरेदीसाठी ग्राहकच नसल्याचे चित्र आहे, असे मुनोत कलेक्शनचे मालक राजेंद्र मुनोत म्हणाले.
यंदा सोन्याचा भाव ५ हजारांनी उतरला. मात्र, पावसाअभावी भाव उतरूनही अपेक्षेप्रमाणे ग्राहक नाही. भाव उतरल्याने काहीच ग्राहक खरेदी करीत असले, तरी दुष्काळामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या कमालीची रोडावल्याचे शुभम ज्वेलर्सचे मंगेश लोळगे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2015 रोजी प्रकाशित
अर्थकारणाचे चक्र मंदावले, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
सलग तीन वर्षांपासून पावसाअभावी शेती उत्पादनाला मोठा फटका बसल्याने शेतीवर अवलंबून असलेली बाजारपेठ पूर्ण कोलमडली आहे. शेतातील पीक बाजारात न आल्याने शेतकऱ्यांच्या हातात पसा नाही.
First published on: 28-07-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economics circule slow in market