धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन चिघळत चालले आहे. धनगर समाजबांधवांनी गुरुवारी आंदोलन अधिक तीव्र केले. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे बसच्या काचा फोडल्या, तर उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
‘धनगड’ हा शब्द िहदी असून महाराष्ट्रातील धनगर समाज या प्रवर्गात मोडत नाही. परंतु ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे दोन्ही शब्द एकच असल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयानेही दिला आहे. असे असताना सवलतींपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू न केल्यास निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा देणारे निवेदन सरकारला देण्यात आले.
उपोषणात कमलाकर दाणे, संदीप वाघमोडे, अनिल ठोंबरे, यशवंत डोलारे आदींनी सहभाग नोंदविला. डॉ. गोिवद कोकाटे, राजाभाऊ वैद्य, अॅड. खंडेराव चौरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित िपगळे, उस्मानाबाद तालुकाप्रमुख दिलीप जावळे-पाटील, अॅड. व्यंकट गुंड, प्रशांत कावरे आदींनी पाठिंबा दिला.
बेंबळी ग्रामपंचायतीवर मोर्चा
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षण द्यावे, तांडावस्ती सुधार योजनेचा निधी मंजूर करवून घेऊन गावातील धनगरवस्ती विकासासाठी खर्च करावा, या मागण्यांसाठी धनगर समाजबांधवांनी गुरुवारी मेंढरांसह बेंबळी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. शिवाजी फस्के, दत्ता सुडके, धनगर विकास परिषदेचे शिवाजी गावडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास प्रारंभ झाला. मेंढपाळ गोरोबा कोकरे व लक्ष्मण गाडे यांनी मेंढरांसह सहभाग नोंदविला. ग्रामपंचायत सदस्य बालाजी गावडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ सोनटक्के, मोहन खापरे, नंदकुमार गावडे, नवनाथ कांबळे, महादेव गावडे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. ग्रामसेवक सोनटक्के व तलाठय़ांना निवेदन देण्यात आले.
काक्रंब्यात बसवर दगडफेक
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा या धनगरबहुल गावात याच मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी एस. टी. महांडळाच्या बसवर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तुळजापूर-लातूर मार्गावर अर्धातास रास्ता रोको आंदोलन झाले. बसवर दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. आंदोलनकर्त्यांनी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणास विरोध दर्शविणाऱ्या आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या पुतळयाचे दहन केले. भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष महानंदा पलवान, शहाजी देवगुंडे, अजय शेंडगे, नंदकुमार देडे, बालाजी बंडगर, श्याम ढेरे यांच्यासह तरुण व वयोवृद्ध नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2014 रोजी प्रकाशित
उस्मानाबादेत उपोषण, बेंबळीमध्ये मोर्चा
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन चिघळत चालले आहे. धनगर समाजबांधवांनी गुरुवारी आंदोलन अधिक तीव्र केले.

First published on: 01-08-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast in kakramba rally in bembali