परळी शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ता व्हावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन ११ कोटी रुपयांचा निधी, तर मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या कामासाठीही तब्बल २२ कोटी निधी मंजूर झाला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चार महिन्यांत मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी एकूण सव्वाशे कोटी निधीची तरतूद करवून घेतली. त्यामुळे मतदारसंघातील रस्त्यांची कामे आता वेगाने होणार आहेत.
परळीच्या आमदार व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शहराच्या बाह्यवळण रस्त्यासाठी सरकारकडून तब्बल ११ कोटींची तरतूद करवून घेतली, तर मतदारसंघातील इतर रस्त्यांसाठीही मोठय़ा प्रमाणात निधीची तरतूद केल्याने दळणवळणाची सुविधा चांगली होईल, अशी अपेक्षा आहे. यात बीड-परळी-गंगाखेड रस्ता साडेतीन कोटी (साडेचार किमी), सोनपेठ-इंजेगाव-परळी-पुस-बर्दापूर ३ कोटी (१० किमी), पोहनेर-सिरसाळा-मोहा-गर्देवाडी ३ कोटी ९० लाख (१३ किमी), खोडा सावरगाव-दैठणा-गंगाखेड २ कोटी (७ किमी ), सिरसाळा-पोहनेर रस्त्यावर गोदावरीवरील मोठय़ा पुलाची दुरुस्ती ५५ लाख, अंबाजोगाई-गिता-जवळगाव-हातोला रस्ता १ कोटी ४५ लाख (६ किमी), परळी-घाटनांदूर रस्ता १ कोटी ८५ लाख (५.५ किमी), रामा १५६ ते गुट्टेवाडी जिल्हा सरहद्द रस्ता ७५ लाख (३ किमी) बर्दापूरकर प्रजिमा ५७ ते घाटनांदूर प्रजिमा ५४ रस्ता दोन कोटी (९.५ किमी ) रामा २३३ ते हाळम-दैठणा-अंतरवेली रस्ता ७० लाख (२ किमी), धानोरा-बर्दापूर-तळेगाव घाट -निरपणा प्रजिमा ५७ रस्ता १ कोटी पाच लाख (४ किमी), धानोरा-बर्दापूर-तळेगाव घाट – निरपणा रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ६० लाख, डाबी-इंदपवाडी -परळी प्रजिमा ५३ रस्त्याची सुधारणा करणे ५० लाख (२ किमी), तर केंद्रीय मार्ग निधीतून ८५ कोटी, नाबार्ड योजनेतून ६ कोटी, तर सन २०१५-१६च्या अर्थसंकल्पात ३२ कोटी ८५ लाख असा एकूण १२३ कोटी ८५ लाख निधी मंजूर झाला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2015 रोजी प्रकाशित
परळी मतदारसंघातील रस्त्यांसाठी चार महिन्यांत सव्वाशे कोटी निधी
परळी शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ता व्हावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन ११ कोटी रुपयांचा निधी, तर मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या कामासाठीही तब्बल २२ कोटी निधी मंजूर झाला.
First published on: 05-04-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fund for road work in parali