केजरीवाल यांची शेतकरी हिताची भूमिका आहे. त्यांनी स्वामिनाथन शिफारशीची मागणी मान्य केल्यानंतरच मी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत प्रवेश केला असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगले मतदारसंघातील ‘आप’चे उमेदवार रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले,‘‘राजू शेट्टी शेतक ऱ्यांच्या मुलांना चुकीचा मार्ग दाखवत आहेत. महायुतीचे नेते गोपीनाथ मुंडे व शेट्टी यांनी सी. रंगराजन, स्वामिनाथन या दोंन्ही आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणीसाठी लोकसभेत आवाज उठविला नाही. मग ते शेतकरी हितासाठी राजकारण करतात असे कसे म्हणायला हवे? काँग्रेस व भाजप हे दोंन्ही पक्ष देशात उद्योगपतींना मदत करतात.’’
ते पुढे म्हणाले की, शेतकरी चळवळीविरोधी त्यांचे धोरण आहे. शेट्टी यांना आमदार, खासदार करण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. मीच शेतकऱ्यांचा नेता आहे असे ते दाखवितात. शेतकरी चळवळीविरोधात घोटाळे करणाऱ्या मुख्यमंत्री, मंत्री व सरकार विरोधात शेट्टी काहीही बोलत नाहीत, असेही ते म्हणाले.