यवतमाळ तालुक्यातील बेलोना शिवारात एका बिबटय़ाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
यवतमाळ-नागपूर महामार्गावरील बेलोनाजवळ एका नाल्यात बिबटय़ा मृतावस्थेत पडलेला काही लोकांच्या दृष्टीस आढळला. त्यांनी सहायक वनरक्षक अविनाश गणमोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.के. पटवारी, पोलीस निरीक्षक दिनेश ठोसरे यांना ही घटना कळविली. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कळंब येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.के.डी.देशभ्रतार व डॉ.एन.जी. रामगडे यांनी बिबटय़ाचे शवविच्छेदन केले. बिबटय़ाचे वय २ वर्षे असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कळंब-दत्तापूर मार्गावरील वनविभागाच्या नर्सरीत बिबटय़ावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2013 रोजी प्रकाशित
अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटय़ा ठार
यवतमाळ तालुक्यातील बेलोना शिवारात एका बिबटय़ाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. यवतमाळ-नागपूर महामार्गावरील बेलोनाजवळ एका नाल्यात बिबटय़ा मृतावस्थेत पडलेला काही लोकांच्या दृष्टीस आढळला.
First published on: 16-01-2013 at 05:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard dies in road accident