रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची  एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याचा वन्यप्राण्याशी झटापटीत किंवा उपासमारीने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातीव फणसस्टॉप येथे मृत बिबट्या असल्याची माहिती ग्रामस्थांमार्फत वनविभागाला मिळाल्यावर रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली व पंचनामा केला तसेच मृत बिबट्याला ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही कारवाई वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, सूरज तेली, अरूण माळी यांनी केली. यानंतर दाभोळे येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनाली शेट्ये यांच्यामार्फत या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या बिबट्याच्या अंगावर जखमा असल्याने या बिबट्याची वन्यप्राण्याशी झटापट झाली असावी यात त्याची लढण्याची ताकद संपुष्टात आल्याने तसेच उपासमारीने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनपाल तौफीक मुल्ला यांनी व्यक्त केला आहे. हा बिबट्या नर जातीचा असून तो एक ते दिड वर्षाचा असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. वनविभागामार्फत या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard found dead in sangameshwar zws