गेल्या वर्षी महाअंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावणाऱ्या रत्नागिरी विभागातून यंदा कोणती एकांकिका महाअंतिम फेरीत येणार, याचा निर्णय आज, शनिवारी होणार आहे. रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाटय़मंदिरात रंगणार आहे. रत्नागिरी विभागाची प्राथमिक फेरी २ ऑक्टोबर रोजी झाली. त्यातून गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (भोग), नवनिर्माण महाविद्यालय (गिमिक), डीबीजे महाविद्यालय, चिपळूण (अपूर्णाक), स. का. पाटील महाविद्यालय, मालवण (फ्लाइंग क्वीन्स) आणि कला व वाणिज्य महाविद्यालय, ओरोस (संजीवनी) या एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्या. रत्नागिरी विभागाच्या अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरलेली एकांकिका १७ ऑक्टोबरला महाअंतिम फेरीत सादर होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokankika at ratnagiri