महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी, २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, विद्यार्थी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागेल, अशी अपेक्षा बाळगून आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीच्या जवळपास १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, महाराष्ट्र शिक्षण मंडळ पुढील आठवड्यात निकाल जाहीर करण्यासंदर्भात तयारी सुरु केली आहे.  कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखेत मिळून जवळपास १५ लाख विद्यार्थी निकालाची प्रतिक्षा करत आहेत. यातील विज्ञान शाखेतील विद्यार्थांची  संख्या अधिक असून त्यानंतर कला आणि सर्वात कमी वाणिज्य शाखेला पसंती दिली होती.

बारावीनंतर काय कराल?

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra hsc result 2017 maharashtra board 12th result expected next week