गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भाग असलेल्या मालेवाडा येथील वन विभागाचे कार्यालय गुरुवारी पहाटे नक्षलवाद्यांनी जाळले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून, कार्यालयातील कागदपत्रे आणि इतर वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.
बुधवारीच छत्तीसगढमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या चार पोलीस अधिकाऱय़ांची हत्या केली. त्यानंतर लगेचच दुसऱया दिवशी गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाचे कार्यालय जाळण्यात आले. जयदेव यादव, मंगल सोधी, राजू तेला आणि रामा मज्जी अशी बुधवारी हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱयांची नावे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2015 रोजी प्रकाशित
मालेवाडात नक्षल्यांनी वन विभागाचे कार्यालय जाळले
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भाग असलेल्या मालेवाडा येथील वन विभागाचे कार्यालय गुरुवारी पहाटे नक्षलवाद्यांनी जाळले.

First published on: 16-07-2015 at 10:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maoist burned forest office in melewada