मासेमारी बंदी कालावधी असताना मासेमारी कशी होते असा आक्रमकतेने प्रश्न काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विचारला. त्यावेळी टेबलावर मासे टाकले गेले तेव्हा आम. राणे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. वन्स यांच्या अंगावर फेकले.

परप्रांतीय लोकांना मच्छीमारी करण्यास देत असल्याने आम. नितेश राणे मत्स्य विभागाच्या कार्यालयात पोहोचले. मच्छीमारी बंदी आहे तर हे मासे कोठून आले असा प्रश्न विचारला. यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. वन्स यांनी उद्धट उत्तरे देताच आमदार नितेश राणे संतापले. या अधिकाऱ्याच्या उद्धट उत्तरामुळे आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या अंगावर मासे फेकून मारत आक्रमकतेने मच्छीमारांचे प्रश्न मांडले.

मच्छीमारांच्या अनधिकृत मच्छीमारीला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आलो होतो. मच्छिमारांना न्याय मिळावा एवढाच हेतू होता असे आम. राणे म्हणाले. आमदार राणे यांच्या सोबत शिवसेनेचे बाबी जोगी, भाजपाचे रविकिरण तोरसकर मच्छिमारांचे प्रतिनिधीत्व करत होते. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या अकार्यक्षमतेमुळे मच्छिमारांना न्याय मिळत नाही म्हणून आमदार नितेश राणे यांनी मच्छिमारांचे प्रतिनिधीत्व केले असे सांगण्यात आले.