छगन भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणेंचं खोचक ट्वीट, म्हणाले ”आता तुम्हाला सरस्वतीही…” | Loksatta

छगन भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणेंचं खोचक ट्वीट, म्हणाले ”आता तुम्हाला सरस्वतीही…”

छगन भुजबळ यांनी धमकी दिल्याचा आरोप करत एका व्यक्तीने चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी छगन भुजबळ यांना खोचक टोला लगावला.

छगन भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणेंचं खोचक ट्वीट, म्हणाले ”आता तुम्हाला सरस्वतीही…”
(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी धमकी दिल्याचा आरोप करत एका व्यक्तीने चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी छगन भुजबळ यांना खोचक टोला लगावला. आता तर भुजळांना सरस्वती देवीही वाचवू शकणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा – छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप; सरस्वती वक्तव्याशी आहे संबंध

“हे हिंदुत्त्वाचे सरकार आहे, लक्षात ठेवा”

“चेंबूरमधील व्यावसायिकाने सरस्वतीचा राग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता तर आई सरस्वती देदेखील त्यांना वाचवू शकत नाही. हे हिंदुत्त्वाचे सरकार आहे. हे त्यांनी आता लक्षात ठेवावं”, असे ट्वीट नितेश राणेंनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

चेंबूरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितचंद टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन आणि मेसेजद्वारे धमकावल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे.

छगन भुजबळांचा सरस्वती बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे दोन व्हिडिओ शेअर केल्यामुळे मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही टेकचंदानी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol-Diesel Price on 1 October 2022: ग्राहकांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने घसरण

संबंधित बातम्या

“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
उदयनराजेंच्या नाराजीवर शिवेंद्रसिंहराजेंचे मोठे विधान, म्हणाले “ज्या घराण्याचे वारस आहात त्याच…”
“पाच कोटी मोजायला गेले होते का?” चंद्रकांत खैरेंच्या आरोपाला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
VIDEO: “चंद्रकांत खैरे नावाचा बुड्ढा पिसाळल्यासारखं…” एकेरी उल्लेख करत संजय गायकवाडांची टीका!
“दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि…”, पुरंदरेंचा उल्लेख करत काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी