वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने नंदुरबार येथील एकाची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शहर पोलिसात दाखल झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सतीश ऊर्फ आकाश भूपत भाई कानानी (वय २३, रा. सुरत-गुजरात) व काझी तौफीक इस्लाम काझी महंमद शाफी काझी (वय ४३, रा. पश्चिम बंगाल) या दोघा परप्रांतीयांना ताब्यात घेतले. या प्रकरणी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काहींचा सहभाग आहे का याची चौकशी सुरू असून, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2014 रोजी प्रकाशित
मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने नंदुरबार येथील एकाची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शहर पोलिसात दाखल झाला आहे.

First published on: 18-03-2014 at 03:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One crore fraud medical entry