राज्यातील धनगर व तत्सम जातींचा तसेच कोणत्याही बिगर आदिवासी जमातीचा आदिवासी सूचीत समावेश करून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
महासंघाचे कार्याध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील ४५ आदिवासी जमातींपकी आदिवासी पारधी ही एक जमात आहे. ती अत्यंत अप्रगत व मागास अवस्थेत आहे. राज्यात दरवर्षी पारधी समाजाच्या विकासाकरिता कोटय़वधी रुपये खर्ची घातले जातात. परंतु तरीही विकास साध्य झालेला नाही. खुल्या प्रवर्गावर आर्थिक सुबत्तेने मात करणाऱ्या धनगर व तत्सम जातींचा आदिवासींमध्ये समावेश करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे या निर्णयाच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनसेचा बैलगाडी मोर्चा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नळदुर्ग, तुळजापूर व उमरगा येथे मनसेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंके व तालुकाध्यक्ष हरि जाधव यांनी केले. शहरातील हुतात्मा स्मारकापासून या मोर्चास प्रारंभ झाला. राष्ट्रीय महामार्गावरून निघालेला हा बलगाडी मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. या वेळी तहसीलदार उत्तम सबनीस यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2014 रोजी प्रकाशित
धनगर समाजाच्या आरक्षण मागणी विरोधात पारधी समाजाचा मोर्चा
राज्यातील धनगर व तत्सम जातींचा तसेच कोणत्याही बिगर आदिवासी जमातीचा आदिवासी सूचीत समावेश करून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
First published on: 15-08-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally of pardhi society against dhangar society reservation