जालना येथे २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी येथील आरवायके कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू सहभागी होणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित विभागीय स्पर्धेतील १९ वर्षांखालील १०० व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मधुरा कुलकर्णी हिने वैयक्तिक प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. तिहेरी उडी व १०० मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात निर्णिता न्याहाटकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर ४ बाय १०० या सांघिक प्रकारात आरवायकेच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-11-2012 at 06:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ryk player included in state lavel sports