विरार : आफताब दररोज मला मारहाण करत असून तो माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकून देईल अशी लेखी तक्रार श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. श्रद्धा ची ही भीती खरी ठरली आहे. श्रद्धा ने केलेला हा अर्ज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो मोठा पुरावा ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० मध्ये तुळींज पोलीस ठाण्यात आफताबच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीत तिने आफताब मागील सहा महिन्यापासून मारहाण करत असून त्याने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत शरीराचे तुकडे करून फेकून देत्यात बद्दल लिहले आहे. या बाबत आफताबच्या कुटुंबाला सुद्धा माहिती असल्याचे तिने खुलासा केला आहे. श्रद्धाने आफताब आणि ती लवकरच लग्न करणार असल्याचे सुद्धा सांगितले आहे. यामुळे जर वेळीच पोलिसांनी कारवाई केली असती तर आज श्रद्धा जिवंत असती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha applied to the police in 2020 that aftab is going to kill me and throw into pieces virar delhi murder tmb 01