लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई :  जागतिक पातळीवर संवेदनशील भाग म्हणून ज्याची घोषणा करण्यात आली आहे, अशा कास पठारावर पर्यटन महोत्सवाच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने मनोरंजनाचे व खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लेझर शो, संगीत, नाचगाण्याचे कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्यासाठी डीजेचा वापर करण्यात येणार असल्याचे समजते. या कार्यक्रमाचे आयोजन जरी खासगी पातळीवर होत असले तरी त्याला शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य असल्याचे या महोत्सवाच्या प्रसिद्धी साधनांवरून समजते. महाबळेश्वर, पाचगणी, भिलार, माथेरान येथे होत असलेल्या पर्यटन महोत्सवाच्या धर्तीवर या महोत्सवाचे ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यासाठी किमान पंधरा हजार पर्यटक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourism festival on the sensitive kaas plateau zws
First published on: 05-10-2022 at 04:34 IST