वसई : टाळेबंदीत वसई-विरारमधील काही भागांतील नागरिकांसमोर पाणी संकट उभे ठाकले आहे. पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने जलवाहिन्यातून पडणारम्य़ा पाण्याच्या थेंबावर नागरिक आपली तहान भागवत असल्याचे विदारक चित्र दिसून आले आहे.
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात मोठय़ा संख्येने बैठय़ा चाळी आहेत. या चाळीतील बहुतांश चाळीत कोणत्याच प्रकारच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने या नागरिकांना विकतचे पाणी खरेदी करावे लागते परंतु
करोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आल्यापासून पाणीही पोहचत नसल्याने चाळीत राहणारम्य़ा नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. वसई पूर्वेतील रेंज ऑफिस परिसर आणि भोयदापाडा येथील चाळ परिसरात राहणारे नागरिक पालिकेच्या जलवाहिन्यातून होणाऱ्या गळतीमुळे पाणी भरण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या गिन्या, बाटले रांगेत ठेवण्यात आले आहेत. थोडय़ाफार प्रमाणात जे काही पाणी मिळत आहेत, त्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
टाळेबंदीत विविध ठिकाणच्या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने हाल होऊ लागले आहेत.
शासनाने अशा ठिकाणच्या भागाची पाहणी करून या नागरिकांसाठी पाण्याची योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागमी वसईतील सामाजिक कार्यकर्ते राज दसोनी यांनी केली आहे.
विंधण विहिरी कोरडय़ा
नोकऱ्या-कामधंदे बंद असल्याने जवळचे पैसे ही संपले आहेत त्यामुळे विकतचे पाणी घेणेही शक्य होत नाही. यासाठी दररोज सकाळी ६ वाजल्यापासून जलवाहिन्यातून थेंब थेंब पडणारे पाणी घेण्यासाठी रांगा लावल्या जात आहेत. तर चाळीतील रहिवाशांसाठी विंधण विहिरीतून येणारे पाणीही बंद झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
