यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांचे मंगळवारी सकाळी नागपुरात निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णकुमार आजारी होते. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली.
डॉ. कृष्णकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या विकास कॉलनीतील निवासस्थानी लोकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. डॉ. आंबेडकर महाविद्यालयात काही काळ त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर भदन्त सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.