young tourist from pune drowned while swimming in sea at gaonkhadi in ratnagiri zws 70 | Loksatta

समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : पुण्याहून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा गावखडी येथील समुद्रात बुडून मृत्यू ओढवला आहे . पोलिसांकडून या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत काळे, आकाश सुतार, राजकुमार पिटले आणि कृष्णा येडीलवाड (सर्वजण रा. पुणे) हे चौघे मित्र रविवारी रत्नागिरीत पर्यटनासाठी आले होते. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे रस्त्याच्या बाजूला असलेले सुरूचे बन, शांत किनारा पाहिल्यावर […]

समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
आकाश सुतार

रत्नागिरी : पुण्याहून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा गावखडी येथील समुद्रात बुडून मृत्यू ओढवला आहे . पोलिसांकडून या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत काळे, आकाश सुतार, राजकुमार पिटले आणि कृष्णा येडीलवाड (सर्वजण रा. पुणे) हे चौघे मित्र रविवारी रत्नागिरीत पर्यटनासाठी आले होते. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे रस्त्याच्या बाजूला असलेले सुरूचे बन, शांत किनारा पाहिल्यावर ते सकाळी साडेअकरा वाजता किनाऱ्यावर फिरायला गेले. तेथे मोबाइल फोनवर एकत्र छायाचित्रे घेतल्यानंतर त्यांच्यापैकी आकाश सुतार दुपारी दोनच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरला. त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्यामुळे किनाऱ्यावर बसून होते. यावेळी समुद्राला भरती आली होती. तसेच काही प्रमाणात वारे वाहत असल्यामुळे पाण्याला करंटही होता.

हळूहळू लाटांचा वेग वाढू लागला, पण आकाशला पाण्याचा अंदाज आला नाही आणि बघता बघता तो लाटांच्या तडाख्याने खोल समुद्रात ओढला गेला. आकाश बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मित्र राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला; परंतु समुद्राच्या लाटांमध्ये आकाश दिसेनासा झाला होता. किनाऱ्यावरील त्याच्या मित्रांनी तातडीने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथून पोलीस अंमलदार आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आकाश बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. बुडालेल्या आकाशचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता, पण तो सापडला नाही. मात्र सोमवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास किनाऱ्यावर वाळूत रुतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर तो त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती ; सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णय

संबंधित बातम्या

“तडजोड करणार नाही,” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचल्यानंतर ठाकरे गट संतापला, म्हणाले “केंद्राला आणि वरिष्ठांनाही जुमानत…”
“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा”, संजय राऊतांच्या टीकेला आपचं प्रत्युत्तर, म्हणाले, “सतत ‘डील’…”
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”
“भुंकणारे कुत्रे आणि ते संजय राऊतांचे…” ठाकरे गटाच्या नेत्यावर संजय शिरसाटांचं टीकास्र!
VIDEO: बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना २८८ पैकी १०० जागांपर्यंत पोहचू शकले नाहीत – संजय गायकवाड

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Maharashtra Karnataka Dispute: “पुन्हा असं भाष्य केलं तर…”, मुनगंटीवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले “ही नेहरुंची चूक”
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव का दिलं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण; म्हणाले, “मी मंत्री असताना…”
आवळा खाल्ल्याने ‘खराब कोलेस्ट्रॉल’ झपाट्याने कमी होईल; फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या
Maharashtra Karnataka Dispute: “आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या…”, संजय राऊतांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!
Video: बहिणीच्या नवऱ्यासोबत मेहुणीने केलेल्या डान्सची नेटकऱ्यांना भूरळ; म्हणाले, ‘आमची नजरच हटेना…’