X
X

‘फक्त बायकोच नाही, तर तिचा पुतळा सुद्धा सेक्सी’ – रणवीर सिंग

READ IN APP

रणवीर अनेक वेळा दीपिकाप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतो

ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग. एका चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी एकत्र आली आणि तेव्हापासून त्यांच्यात असलेलं मैत्रीचं नातं आणखी खुलत गेलं. मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालेल्या या जोडीने लग्नगाठ बांधली असून आजही ही जोड चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. रणवीर आणि दीपिका यांच्यामधील प्रेम, मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. रणवीर अनेक वेळा सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून दीपिकाप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतो. यावेळीदेखील त्याने असंच काहीसं केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यावेळी त्याच्या दीपिकावरील प्रेमाचा प्रत्यय साऱ्यांना आला. केवळ दीपिकाच नाही तर तिचा मेणाचा पुतळासुद्धा तितकाच सुंदर आणि सेक्सी असल्याचं त्याने म्हटलं आहे.

आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये रणवीरला पद्मावत या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी भावना व्यक्त करताना त्याने दीपिकाविषयीही त्याचं मत व्यक्त केलं. सोबतच लवकरच लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये त्याचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचं त्याने सांगितलं.

“इथे मी एक सांगू इच्छितो की, लंडनमधील मादाम तुसाँमध्ये माझ्या पत्नीचा असलेला पुतळा हा सर्वात जास्त सेक्सी आहे. इतकंच नाही तर ती एक परफेक्शनिस्ट सुद्धा आहे. त्यामुळेच तिचा पुतळा तयार करत असताना तिने अनेक बारकाव्यांचा नीट अभ्यास आणि विचार केला होता”, असं रणवीर म्हणाला.

वाचा :  ‘कभी अलविदा ना…’मधील शाहरुखचा तो मुलगा १३ वर्षानंतर असा दिसतो, पाहून थक्क व्हाल

दरम्यान, लंडनमधील मादाम तुसाँमध्ये दीपिकाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला असून लवकरच रणवीरचा पुतळादेखील उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रणवीरचा मेणाचा पुतळा असावा अशी दीपिकाच्या आईची प्रकर्षाने इच्छा होती.

24
X