X
X

‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम अर्चना निपाणकरने लावला मुंबईच्या स्वच्छतेत हातभार

READ IN APP

निकटून्स मोटू-पतलू आणि शिव यांनीदेखील स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग

गणपत्ती बाप्पाचे स्वागत आपण खूपच उत्साहात, जल्लोषात करतो. परंतु विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना सगळ्यांनाच खूप दु:ख होते. विसर्जनाच्या दिवशी कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील दीपिका म्हणजेच अर्चना निपाणकर, निकटून्स मोटू-पतलू आणि शिव यांनी ७०० विद्यार्थांसोबत (Children’s Movement for Civic Awareness (CMCA) शहरातील तीन प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छतेच्या मोहिमेद्वारे शहरामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या लहान मुलांसोबत त्यांचे लाडके निकटून्स मोटू-पतलू आणि शिव, तसेच अर्चनाने नागरीकांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करा आणि जबाबदार नागरीक व्हा असा संदेश दिला. दरवर्षी आपल्या शहरामध्ये काय तर संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर देखील गणेशोत्सव उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे होणारे प्रदूषण आणि होणारे पर्यावरणाचे नुकसान याबाबत अजूनही समाजातील बरीच मंडळी अनभिज्ञ आहे.

उत्सव साजरा करण्याच्या जबाबदारीवर सीएमसीएने नेहमीच भर दिला आहे. शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, मुले त्यांच्या शाळा आणि परिसरात इको-गणेश मोहिम चालवतात जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पर्यावरणीय प्रभावाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि पर्यावरणाला अनुकूल वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतात.

20
X