Advertisement

‘मुलाला कळाले तर…’, १४ वर्षांनी लहान मुग्धाला डेट करणाऱ्या राहुल देवनं सोडलं मौन

राहुलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

मधुर भांडारकर यांच्या फॅशन या चित्रपटातून नावरुपाला आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे हे नाव आता कलाविश्वासाठी नवीन नाही. कमी कालावधीमध्ये अभियाची चुणूक दाखविणाऱ्या या अभिनेत्रीच्या अभिनयाचे कायमच कौतुक करण्यात येते. अभिनयामुळे चर्चेत येणारी मुग्धा तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही तितकीच चर्चेत येत असते. मुग्धा तिच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेला दाक्षिणात्य अभिनेता राहुल देवला डेट करत आहे. आता राहुलने त्याच्या रिलेशनशीपवर वक्तव्य केले आहे.

नुकतीच राहुलने आरजे सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने पहिली पत्नी रीना देवच्या निधनानंतर अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करण्याबाबत उघडपणे वक्तव्य केले. ‘जेव्हा मी विवाहीत होतो तेव्हा कोणापासूनही लग्न केल्याचे सत्य लपवले नाही. त्यावेळी मी चित्रपटात देखील काम केले नाही. आपल्या जीवनातील काही गोष्टी या खऱ्या असतात बाकी सर्व… जर तुमच्या आयुष्यात कुणी तरी महत्वाचं असेल तर इतरांपासून त्याला का लपवायचे मला कळत नाही. सुरुवातीला मुलाला माझ्या रिलेशनशीपविषयी कळाले तर तो ते ऐकू कशी प्रतिक्रिया देईल याची मला थोडी भीती वाटत होती’ असे राहुल म्हणाला.

आणखी वाचा : ‘आवडती बेड पोझिशन कोणती?’, राधिका आपटे म्हणाली…

पुढे तो म्हणाला, ‘हो आमच्यामध्ये अंतर आहे, काही वर्षांचे. पण बाकी इतर अनेक गोष्टी आहेत आणि माझ्या कुटुंबाची देखील दुसरी बाजू आहे. कधीकधी असे वाटते की आयुष्यात पुढे निघून जाण्याने तुम्ही त्यांना न कळत दुखावत तर नाहीयेत ना..’

राहुल देवची पहिली पत्नी रीना देवचे २००९मध्ये निधन झाले. त्यांना एक मुलगा सिद्धार्थ देखील आहे. त्यानंतर २०१३मध्ये राहुल देवने अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करण्यास सुरुवात केली.

राहुल देवने ‘चॅम्पियन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्तम खलनायक या पुरस्कारसाठी नामांकन मिळालं होता. या चित्रपटानंतर त्याने ‘इंडियन’, ‘आशिक’, ‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटांमध्येही काम केलं होतं.

20
READ IN APP
X
X