News Flash
Advertisement

‘ये काली काली आंखे गाण्यात काजोलला पाहून…’, २८ वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने केला खुलासा

'बाजीगर' या चित्रपटातील 'ये काली-काली आंखे' हे गाणे हिट ठरले होते

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे ‘सुपर डान्सर चॅप्टर ४.’ या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही परीक्षक म्हणून काम करताना दिसत आहे. या शोच्या आगामी भागामध्ये शिल्पा जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे. ती अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि तिचा १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ चित्रपटाविषयी बोलताना दिसणार आहे.

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या आगमी भागाध्ये कुमार सानू हे पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यावेळी स्पर्धक नीरजा आणि भावना ‘बाजीगर’ चित्रपटातील हिट गाणे ‘ये काली काली आंखे’वर डान्स करताना दिसणार आहे. या दोन स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून जवळपास २८ वर्षांनंतर शिल्पाने खंत व्यक्त केली आहे. तिला या गाण्यात सहभागी व्हायचे होते. ‘बाजीगर’ या चित्रपटातील ‘ये काली-काली आंखे’ हे गाणे हिट ठरले होते. या गाण्यात शाहरुख आणि काजोल दिसले होते.

Video: सलमान लग्न कधी करणार? सलीम खान म्हणाले…

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, शोमध्ये शिल्पा या गाण्याविषयी बोलते. ‘ये काली काली आंखे गाण्यावर काजोल आणि शाहरुखचा डान्स पाहून माझा जळफळाट व्हायचा. कारण हे गाणे मला कारायचे होते. या गाण्यावर मला डान्स करायचा होता’ असे शिल्पाने म्हटले आहे. ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की कोरिओग्राफर आणि शोची परीक्षक गीता पाहुणे कुमार सानू यांना स्टेजवर शिल्पासोबत डान्स करण्यास सांगते.

‘ये काली काली आंखे’ या गाण्याविषयी बोलताना कुमार सानू म्हणाले की हे गाणे अनु मलिकने कंपोज केले आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी थोडे भांडण झाले होते. पण हे गाणे हिट ठरले होते असे कुमार सानू यांनी म्हटले आहे.

21
READ IN APP
X
X