X
X

‘या’ चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र येणार नवाज-सोनाक्षी

या चित्रपटात सोनाक्षी मुख्य भूमिकेत झळकणार आहे

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘टोटल धमाल’ या चित्रपटातील ‘मुंगडा’ या गाण्याच्या रिमेकमध्ये सोनाक्षीने ठेका धरला होता. अनेकांनी या गाण्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. या गाण्यानंतर सोनाक्षी लवकरच ‘कलंक’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त तिच्या पदरामध्ये आणखी एक चित्रपट पडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आगामी चित्रपटामध्ये सोनाक्षी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सोनाक्षी, नवाज स्टारर या चित्रपटाचं नाव ‘बोले चुडिया’ असं असून नवाजचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शमास या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध घेत होता. त्याचा हा शोध आता पूर्ण झाला असून त्याने सोनाक्षीची मुख्य अभिनेत्री म्हणून निवड केली आहे.

दरम्यान, सोनाक्षीनेदेखील या चित्रपटासाठी होकार दिला आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे. बोले चुडिया व्यतिरिक्त सोनाक्षी ‘कलंक’, ‘मिशन मंगल’, ‘दबंग ३’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तर नवाज सध्या मोतीचुर या चित्रपटामध्ये व्यस्त आहे.

 

24
Just Now!
X