Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  1. Marathi News
  2. manoranjan
  3. 10 actors who have died most in films from john hurt to christopher lee mppg
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2020 रोजी प्रकाशित

मृत्यूंजय! ‘या’ अभिनेत्यांनी केला मृत्यूंच्या भूमिकांचा विक्रम

Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated: March 3, 2020 13:25 IST
Follow Us
चित्रपट कलाकारांना अत्यंत सौभाग्यशाली असे मानले जाते. कारण त्यांना आपल्या आयुष्यात चित्रपटांच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळते. खोटे खोटे का होईना, परंतु त्यांना विविध प्रवृत्तीच्या व्यक्तींचे आयुष्य जगण्याची संधी मिळते. परंतु त्याचबरोबर चित्रपटांमध्ये त्यांचा मृत्यू देखील होतो. आज आपण या फोटो गॅलरीत असे कलाकार पाहाणार आहोत. ज्यांनी मृत्यूमध्ये देखील विक्रम केला आहे. चित्रपटांमध्ये सर्वाधिक ३० पेक्षा अधिक वेळा मरणारे कलाकार...
चित्रपट कलाकारांना अत्यंत सौभाग्यशाली असे मानले जाते. कारण त्यांना आपल्या आयुष्यात चित्रपटांच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळते. खोटे खोटे का होईना, परंतु त्यांना विविध प्रवृत्तीच्या व्यक्तींचे आयुष्य जगण्याची संधी मिळते. परंतु त्याचबरोबर चित्रपटांमध्ये त्यांचा मृत्यू देखील होतो. आज आपण या फोटो गॅलरीत असे कलाकार पाहाणार आहोत. ज्यांनी मृत्यूमध्ये देखील विक्रम केला आहे. चित्रपटांमध्ये सर्वाधिक ३० पेक्षा अधिक वेळा मरणारे कलाकार...

हॉलिवूड लेजंड अभिनेता विंसेंट प्राइस यांचा ४७ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या अभिनेता टॉम साईजमोर यांचा आतापर्यंत ३६ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
लांस हेनरिक्सन यांना सायंस फिक्शन चित्रपटांचा हिरो म्हणून ओळखले जायचे. त्यांनी ‘एलियन्स’ आणि ‘टर्मिनेटर’ या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका विशेष लोकप्रिय ठरल्या होत्या. त्यांचा एकूण ५१ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
‘हॅरी पॉटर’ चित्रपटांमध्ये ‘गॅरिक ओलिवेंडर’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जॉन हर्ट यांचा ३९ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
अभिनेता एरिक रॉबर्ट्स यांचा आतापर्यंत ३५ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
डेनिस हूपर ७०च्या दशकात रोमँटिक हिरो म्हणून ओळखले जायचे. त्यांचा एकूण ४५ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
बेला लुगोसी १८व्या शतकातील सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे. त्यांचा ३६ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
अभिनेता बोरिस कार्लोफ भयपटांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ६० पेक्षा अधिक भयपटांमध्ये काम केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यांपैकी ४१ चित्रपटांमध्ये त्यांचा मृत्यू होतो.
ख्रिस्तोफर ली हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘स्टार वॉर्स’, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’, ‘जेम्स बॉण्ड’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा एकूण ६० चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
डॅनी ट्रेजो हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘अॅनाकोंडा’, ‘ज्युरासिक पार्क’, ‘ट्रिपल एक्स’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा एकूण ६५ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.

First published on: 03-03-2020 at 13:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 actors who have died most in films from john hurt to christopher lee mppg
Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.