हिंदी चित्रपटसृष्टीत तुम्ही अगदी नवखे असता. त्यात तुमचा भूतकाळ काय.. तर हा एका वाहिनीवर गाजलेल्या मालिकेत नायकाची भूमिका करत होता. एक मालिका, दोन प्रदर्शित झालेले चित्रपट , तिसऱ्या बिग बजेट चित्रपटात केलेली छोटीशी भूमिका आणि बाकी सगळी फक्त तुमच्या नावाने सुरू झालेली चर्चा.. या सगळ्या परिस्थितीत तो कलाकार मोबाइल बंद करून ठेवतो, कोणाशीही संपर्क करत नाही. तेव्हा इंडस्ट्रीत त्याच्या नावाने काय बोंबाबोब केली जाते, याची तुम्हाला कल्पना नसेल. एक नाही, दोन नाही.. तब्बल आठ महिने मी माझी ‘सुशांत’ ही ओळख पुसून टाकली होती. त्यामुळे इंडस्ट्रीत याच्या डोक्यात हवा गेली आहे, अशी बोंब सुरू झाली. घरात आता हा आपल्या माणसांना सोडणार अशी धास्ती तर अंकिताच्या मनात भलत्याच शंका..
‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’चे चित्रीकरण करून मुंबईत परत आलो तेव्हा इंडस्ट्रीत मी किती लोकांबरोबर शत्रुत्व ओढवून घेतलं आहे याची कल्पना मला आली, सुशांत सिंग राजपूत हसत सांगतो. उद्याचा ‘स्टार’ कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आहे, याची त्याला कल्पना आहे. पण, त्या दडपणाखाली त्याला
सुशांतने पहिला चित्रपट केला अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘कायपोचे’, त्यानंतर थेट यशराजचा दुसरा चित्रपट केला तो मनीष शर्मा दिग्दर्शित ‘शुद्ध देसी रोमान्स’, तिसरी ‘पीके’तली छोटी भूमिका आणि आता लागोपाठ ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, शेखर कपूरचा ‘पानी’ आणि महेंद्रसिंग धोनीवरचा चित्रपट.. हे सगळे चित्रपट वेगळे आहेत. आणि ही योगायोगाने घडलेली गोष्ट नाही, असं तो ठामपणे म्हणतो. माझ्याबरोबरचे इतर कलाकार काय करतात, हा विचार मी करत नाही. माझ्यासाठी चित्रपटाची कथा, दिग्दर्शक या गोष्टी फोर महत्त्वाच्या असतात. आत्तापर्यंतच्या या यादीतला केवळ एकच चित्रपट म्हणजे ‘पीके’ हा फक्त मी मला
‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’चा लुक हाही दिबाकरनेच केलेला आहे. माझा चेहरामोहरा त्याने बदलून टाकला. ब्योमकशचे कपडे.. हे सगळं खास बंगाली पद्धतीचं असेल, यावर दिबाकरचा कटाक्ष होता. धोती, ते जाकीट आणि त्याच्या पायातल्या चपला हे सगळं अगदी त्या काळात जसं होतं तसंच वापरण्यात आलं आहे. त्या चपला इतक्या पातळ असायच्या की त्या घालून चालताना पायाला दगड टोचायचे. पण, नाही दिबाकरला ते त्याच पद्धतीचं हवं होतं. त्याने आम्हाला एकाच गोष्टीतून सूट दिली होती ती म्हणजे भाषा. चित्रपटातील व्यक्तिरेखा बंगाली असली तरी आपल्याला हिंदीच चित्रपट बनवायचा आहे हे त्याचं ठाम मत होतं. त्यामुळे संपूर्ण चित्रपटात ब्योमकेश कुठेही तुम्हाला बंगाली बोलताना दिसणार नाही, असं सुशांत म्हणतो. पण, बंगाली लोकांना त्यांच्या संस्कृतीचा कडवा अभिमान असतो त्यामुळे एवढं करूनही मी साकारलेल्या बंगाली ब्योमकेशमध्ये बंगाली लोकांना चुका तर आढळणार नाहीत ना?, अशी शंकाही दिबाकरकडे व्यक्त केल्याचे तो म्हणतो. मात्र, आपण खूप अभ्यास करून ही व्यक्तिरेखा रंगवतो आहोत. जर काही बरोबर ठरलं ते तुझं यश असेल आणि जे काही चुकीचं ठरेल ती माझी जबाबदारी.. इतकं स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या दिग्दर्शकाने दिल्यानंतर काय बिशाद तुमची की तुम्ही काम चांगलं करणार नाही?, असा मिश्कील सवालही त्याने केला.
बॉलीवूडच्या हिरोंप्रमाणे काहीच करायचं नाही, असा चंगच जणू बांधलाय त्याने.. हातात असलेले चित्रपट पूर्ण झाले की लगेचच प्रेयसी अंकिता लोखंडेबरोबर विवाह करण्याची त्याची योजनाही निश्चित आहे. विवाहामुळे कामावर परिणाम होईल वगैरे गोष्टीवर त्याचा विश्वास नाही. मात्र, अचानक मिळालेल्या या ‘स्टारडम’बद्दल तुला काय वाटतं?, या प्रश्नावरही तो सडेतोड उत्तर देतो. ‘स्टारडम’वर त्याचा विश्वास आहे. तुम्हाला ज्या एरव्ही ‘अशक्य’ गोष्टी करायच्या असतात त्या सगळ्या हे ‘स्टारडम’ मिळाल्यावर पूर्ण होतात, असं तो स्पष्टपणे सांगतो. तुमच्याकडे पैसा आलाच पाहिजे. पैसा आला की मग त्याची ‘गरज’ उरत नाही.. त्याचं हे विधान तो अधिक विस्ताराने सांगतो. म्हणजे ‘रेंज रोव्हर’ हे माझ्यासाठी एके काळी स्वप्न होतं आज ती माझ्याकडे आहे. आज प्रत्येक चित्रपट मला पैशासाठी करावा लागत नाही. आता माझ्याकडे पुरेसा पैसा आहे त्यामुळे मला हवे तेच चित्रपट मी करतो, असं तो ठामपणे सांगतो. सध्या ‘महेंद्र सिंग धोनी’वर काम सुरू आहे आणि मग शेखर कपूर दिग्दर्शित ‘पानी’. पण, सध्या तरी त्याला ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ला मिळणाऱ्या प्रतिसादाची उत्सुकता आहे. हा चित्रपट यशस्वी ठरला तर ब्योमकेशच्या सगळ्या ३२ कथा पडद्यावर आणण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
सुशांत सिंग राजपूत
आपण खूप अभ्यास करून ब्योमकेश बक्षी ही व्यक्तिरेखा रंगवतो आहोत. जर काही बरोबर ठरलं ते तुझं यश असेल आणि जे काही चुकीचं ठरेल ती माझी जबाबदारी.. इतकं स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या दिग्दर्शकाने दिल्यानंतर काय बिशाद तुमची की तुम्ही काम चांगलं करणार नाही?
तुमच्याकडे पैसा आलाच पाहिजे. पैसा आला की मग त्याची ‘गरज’ उरत नाही. म्हणजे ‘रेंज रोव्हर’ हे माझ्यासाठी एके काळी स्वप्न होतं आज ती माझ्याकडे आहे. आज प्रत्येक चित्रपट मला पैशासाठी करावा लागत नाही. आता माझ्याकडे पुरेसा पैसा आहे त्यामुळे मला हवे तेच चित्रपट मी करतो..