बॉलीवूड सुपरस्टार आमीर खानने लुधियानात ‘दंगल’च्या सेटवर मकरसंक्रांतचे सेलिब्रेशन केले. आमीरने यावेळी एका घराच्या छतावर जाऊन ‘दंगल’ चित्रपटाच्या कर्मचाऱयांसोबत पंतग उडविण्याचा आनंद लुटला. गेल्या काही महिन्यांपासून ‘दंगल’च्या चित्रीकरणासाठी आमीर पंजाबमध्येच वास्तव्याला आहे. आमीरने सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना मकर संक्रांत आणि लोहरी सणाच्या शुभेच्छा दिल्या. लहानपणाचा आनंद पुन्हा एकदा अनुभवता आल्याचे आमीरने यावेळी म्हटले. दंगलच्या सेटवर येथील स्थानिकांनी आम्हाला मकर संक्रांतीनिमित्ताने गोडाधोडाचे पदार्थ सेटवर खाऊ घातले आणि आम्ही पतंग उडविण्याचाही आनंद लुटला. चित्रीकरण सुरूच आहे पण पंजाबमध्ये साजरा केलेला हा सण नेहमी आठवणीत राहील, असे दंगलचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाले. दरम्यान, प्रख्यात कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांच्या चरित्रपट अर्थात ‘दंगल’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दुसऱया टप्प्यात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2016 रोजी प्रकाशित
‘दंगल’च्या सेटवर आमीरची पतंगबाजी
गेल्या काही महिन्यांपासून 'दंगल'च्या चित्रीकरणासाठी आमीर पंजाबमध्येच वास्तव्याला आहे.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 14-01-2016 at 16:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan celebrates makar sakranti on dangal sets flies kites with locals