तरुणांना नेहमीच उत्तेजन आणि प्रेरणा देणा-या आमिरची साथ आता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफला मिळाली आहे. आगामी चित्रपट ‘हिरोपन्ती’च्या फर्स्ट लूक अनावरणावेळी आमिर टायगरला माध्यमांसमोर परिचित करणार आहे.
‘हिरोपन्ती’चा फर्स्ट लूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित करण्यात येणार असून या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरणही आमिरचं करणार असल्याची शक्यता आहे. ‘आमिरने धूम ३’मध्ये जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम केले होते. या दोघांचेही मैत्रीसंबंध आहेत. इतकेच नाही तर आमिर टायगरल्या लहानपणापासून ओळखतो आणि हे दोघेही एकाच जीममध्ये व्यायाम करण्यास जातात.