बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता. आता आमिर आणि किरणचा जवळचा मित्र अमीन हाजीने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आज सकाळी ते दोघे एकत्र चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत असे सांगितले आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
अमीन आणि आमिर हे जवळपास गेली २० वर्षे मित्र आहेत. त्यांनी ‘लगान’ आणि ‘मंगल पांडे’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले. आता अमीनने ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘लॉकडाउनच्या काळात किरण आणि आमिरमध्ये वाद सुरु झाले. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर मला वाईट वाटले. मी आमिर आणि किरणला खूप वर्षांपासून ओळखतो. माझ्या लग्नाच्या सहा महिने आधी त्यांनी लग्न केले होते’ असे अमीन म्हणाला.
अमीनने नंतर किरण आणि आमिर हे सध्या एकत्र चित्रीकरण करत असल्याचे सांगितले आहे. ‘तुम्हा ऐकून आश्चर्य वाटेल की आज घटस्फोटाची घोषणा केल्यानंतरही ते दोघे कारगिल येथे लाल सिंह चड्ढा चित्रपटाचे चित्रीकरण एकत्र करत आहेत. किरण त्या चित्रपटाची निर्माती आहे. जर त्या दोघांमध्ये भांडणे होत असती तर त्यांनी एकत्र काम केले असते का? अजीबात नाही’ असे अमीन म्हणाला.