ट्विटरवर चाहत्यांना समंजसपणे उत्तर देणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिषेक बच्चनचं नाव अग्रस्थानी येतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सोशल मीडियामुळे चाहते सेलिब्रिटींशी सहजरित्या संपर्क साधू शकतात. मात्र अनेकदा त्यांच्या खोचक प्रश्नांनाही सेलिब्रिटींना सामोरं जावं लागतं. असंच काहीसं अभिषेकसोबतंही घडलंय.
दोन वर्षांपासून हातात एकही चित्रपट नसताना सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी तुझ्याकडे पैसा येतो तरी कुठून असा प्रश्न एका युजरने अभिषेकला विचारला. त्यावर समजंसपणे उत्तर देत अभिषेक म्हणाला की, ‘कारण सर, चित्रपटांची निर्मिती आणि त्यात अभिनय करण्याशिवाय माझे इतरही काही व्यवसाय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे क्रीडा क्षेत्र.’ अभिषेकच्या या उत्तराचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हे पहिल्यांदाच घडलं नसून याआधीही अभिषेकने सोशल मीडियावर चाहत्यांच्या खोचक प्रश्नांचं उत्तर अत्यंत शांतपणे दिल्याचं पाहायला मिळालं.
Because, sir, I have several other businesses that I run apart from acting and producing movies. Sports being just one of them.
— Abhishek ???????? (@juniorbachchan) July 24, 2018
#SuiDhaaga : ममता आणि मौजी लवकरच तुमच्या भेटीला
गेल्या दोन वर्षांमध्ये अभिषेकचा एकही दमदार चित्रपट जरी प्रेक्षकांच्या भेटीला आला नसला तरी क्रीडा क्षेत्रात त्याने बराच पैसा गुंतवला आहे. प्रो कबड्डी लीगच्या जयपूर पिंक पँथर्स संघाचा तो मालक आहे. त्याचप्रमाणे इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या चेन्नई एफसी संघाचा तो सहमालक आहे.