बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो तर कधी ट्रोलर्सला दिलेल्या उत्तरामुळे. सध्या सोशल मीडियावर अभिषेकचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ऐश्वर्याला माझ्याशी लग्न करशील का? असे विचारणाऱ्या चाहत्याला भन्नाट उत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ २०१०मधील कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवादरम्यानचा आहे. या महोत्सवाला ऐश्वर्या आणि अभिषेकने हजेरी लावली होती. दरम्यान तेथे उपस्थित असणाऱ्या एका चाहत्याने ऐश्वर्याला माझ्याशी लग्न करशील का? असे विचारले होते. ते पाहून अभिषेकने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आणखी वाचा : अभिनव आणि श्वेता तिवारीच्या भांडणावर पूर्वाश्रमीच्या पतीची प्रतिक्रिया, म्हणाला..

अभिषेकने ऐश्वर्याकडे हात दाखवत ‘तिने माझ्याशी लग्न केले आहे मित्रा’ असे उत्तर चाहत्याला दिले. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्याचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

ऐश्वर्या आणि अभिषेकने २००७मध्ये लग्न केले. २०११मध्ये त्यांना मुलगी झाली. ऐश्वर्या बऱ्याचवेळा मुलगी आराध्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसते. ऐश्वर्या आणि अभिषेकने ‘धूम २’, ‘गुरु’, ‘कुछ ना कहो’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.