अभिनयाकडून राजकारणाची वाट धरलेल्या नावांच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिनेता परेश रावल. परेश रावल हे त्यांच्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत येतात. ते पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनीच केलेले एक ट्विट. या ट्विटवर सोशल मीडियावर इतकी चर्चा होतेय की त्यावरुन अनेकांनी परेश रावल राजकारणातून संन्यास घेणार का, असाही अर्थ काढलाय.

सोमवारी सकाळी परेश रावल यांनी ‘मी जसा होतो पुन्हा मला तसेच व्हायचे आहे’ (What I want is what I was) असा ट्विट केला. ते राजकारण सोडणार आहेत की काय असा प्रश्न नेटीझन्सनी ट्विटरवरुन त्यांना विचारला. मात्र भाजप खासदार परेश रावल यांनी त्यावर काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात मात्र त्यांच्या राजकारणातील एक्झिटबाबत प्रश्न निर्माण झाले.

Judwaa 2 trailer: ‘जुडवा २’मध्ये रोमान्स आणि कॉमेडीचा परफेक्ट तडका

‘तुम्ही राजीनामा देणार आहात का?,’ असाही प्रश्न अनेकांनी त्यांना ट्विटरवर विचारला. इतकंच नव्हे तर काहींनी त्यावर उपरोधिक टोलाही लगावला. ‘देशाचे नागरिकही हेच म्हणत आहेत की, त्यांना जुने दिवस परत द्या, भाजपकडून वाचवा,’ असे एकाने ट्विट केले. तर काहींनी परेश रावल यांची बाजूही घेतली. आता या ट्विटमधून त्यांना नेमके काय म्हणायचे होते, हे स्वत: परेश रावलच सांगू शकतील. नेटिझन्सना ते काय उत्तर देणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.