‘रामायण’ या मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे टेलिव्हिजन अभिनेते श्याम सुंदर कलानी यांचे निधन झाले. ते कॅन्सरग्रस्त होते. हरयाणामधील कालका येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येत आहे. ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे श्याम सुंदर यांच्या निधनाचे वृत्त कळताच फार दु:ख झाले. ते सज्जन व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो’, असं ट्विट अरुण गोविल यांनी केलं. ‘रामायण’ या मालिकेतून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर त्यांना फारसं काम मिळालं नाही.

‘रामायण’मध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनीसुद्धा ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. श्याम सुंदर कलानी यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका लॉकडाउनच्या काळात पुन्हा एकदा प्रक्षेपित केली जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor shyam sundar who played sugreev in ramayan dies arun govil mourns death ssv