अभिनेता सुबोध भावेच्या हस्ते ‘टकाटक २’ची झलक प्रकाशित

‘अरे कौटुंबिक चित्रपट करणारा मी.. माझ्याकडून प्रौढ विनोदीपटाचे ट्रेलर लाँच करून घेत आहात’, अशी गंमत करत अभिनेता सुबोध भावे याने ‘टकाटक २’ या बहुचर्चित चित्रपटाची झलक प्रकाशित केली. 

अभिनेता सुबोध भावेच्या हस्ते ‘टकाटक २’ची झलक प्रकाशित
टकाटक २

‘अरे कौटुंबिक चित्रपट करणारा मी.. माझ्याकडून प्रौढ विनोदीपटाचे ट्रेलर लाँच करून घेत आहात’, अशी गंमत करत अभिनेता सुबोध भावे याने ‘टकाटक २’ या बहुचर्चित चित्रपटाची झलक प्रकाशित केली.  यानिमित्ताने बनवलेल्या एका छोटेखानी व्हिडीओत सुबोध भावे यांनी ‘टकाटक’ हा पहिला चित्रपट पाहतानाही आपल्याला खूप मजा आली होती, असं सांगत ‘टकाटक २’च्या कलाकारांचे कौतुकही केले.

‘टकाटक’ या चित्रपटाने तिकीटबारीवर खूप चांगली कमाई केली होती. प्रौढ विनोदीपट असा उल्लेख करण्यात येत असल्याने चित्रपटाचा आशय भलताच असेल, अशी शंका कित्येकदा व्यक्त केली जाते. मात्र हा चित्रपट निखळ मनोरंजक चित्रपट असल्याची ग्वाही देत सुबोध भावे यांनी १८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘टकाटक २’ चित्रपटालाही शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटातील घे टकाटक दे टकाटक..ह्ण आणि लगीन घाई..ह्णसारखी ताल धरायला लावणारी गाणी प्रदर्शित झाली असून त्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून टकाटक २ह्ण हा चित्रपट बनला आहे. याची कथा आणि पटकथाही मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. मित्रांचा ग्रुप, त्यांची धमाल-मस्ती, त्यांच्यातील मिश्कील संवाद, विनोदी आणि भावूक प्रसंग, मनोरंजक गाणी, खटकेबाज संवाद आणि या जोडीला पुन्हा काहीतरी वेगळा विचार घेऊन आल्याचे  टकाटक २ह्णची झलक पाहून लक्षात येते.   टकाटक २चं संवादलेखन किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्निल राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार आहेत. गीतकार जय अत्रे यांनी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिलं आहे. सिनेमॅटोग्राफर हजरत शेख वली यांनी सुंदर केलेलं छायालेखन खिळवून ठेवणारं असून, नीलेश गुंडाळे यांनी कार्यकारी निर्मात्याचं काम सांभाळलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एन्टरटेन्मेट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor subodh bhave released takatak 2 movie comedy trailer ysh

Next Story
अजूनही बंधनात मी..
फोटो गॅलरी