मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते विजू खोटे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे ‘शोले’ चित्रपटातील ‘कालिया’. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. विजू खोटे यांचं निधन होऊन आज एक वर्ष झालं. मात्र चित्रपटांच्या माध्यमातून ते आजही प्रेक्षकांमध्ये आहे. म्हणूनच, आज विजू खोटे यांनी साकारलेल्या कालिया या भूमिकेविषयी जाणून घेऊयात. प्रचंड गाजलेल्या या भूमिकेसाठी विजू खोटे यांनी घेतलेलं मानधन ऐकलंत तर कोणीही थक्क होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजू खोटे यांनी आजवर ‘अंदाज अपना अपना’, ‘गोलमाल ३’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘शराबी’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. परंतु ‘शोले’ या चित्रपटाने त्यांना खरी लोकप्रियता मिळवून दिली. १५ ऑगस्ट १९७५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विजू खोटे यांनी

‘कालिया’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटातील खलनायक गब्बर सिंगच्या टोळीतील डाकूच्या भूमिकेत झळकलेल्या विजू खोटे यांनी आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर कालियाला अजरामर केले.

शोलेमध्ये कालियाची भूमिका केवळ सात मिनिटांची होती. या भूमिकेसाठी त्यांना केवळ २ हजार ५०० रुपये इतके मानधन म्हणून देण्यात आले होते. हे मानधन चित्रपटातील इतर कलाकारांच्या तुलनेत सर्वात कमी होते. परंतु या सात मिनिटांमध्ये त्यांनी उच्चारलेल्या ‘सरदार मैंने आपका नमक खाया है’ या वाक्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेडे केले. शोले हा चित्रपट त्यातील कमालीच्या संवादांसाठी ओळखला जातो. परंतु विजू खोटे याचा डायलॉग विशेष लोकप्रिय झाला.

विजू खोटे यांची अभिनय कारकिर्द

विजू खोटे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता होते. विजू खोटेचा जन्म. १७ डिसेंबर १९४१ रोजीचा. विजू खोटे यांनी आपले पिता नंदू खोटे दिग्दर्शित ‘या मालक ‘ ( १९६४) या चित्रपटात मेहमूदसोबत नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असली, तरी देखील पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या. गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या. अशी ही बनवाबनवी या चित्रपटात त्यांनी बाली नावाची खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. विजू खोटे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या असल्या तरी ते त्यांच्या “शोले” चित्रपटातील कालियाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जात असत. कालियाचा “सरकार, मैंने आपका नमक खाया है” हा संवाद आता ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सोबतच त्यांची “अंदाज अपना अपना” या चित्रपटातील रॉबर्ट या भूमिकेतील “गलती से मिस्टेक हो गया” हा संवाद खुप लोकप्रिय झाला होता. विजू खोटेनी मराठीत मस्करी, आयत्या घरात घरोबा, धडाका, घनचक्कर, एक गाडी बाकी अनाडी, इना मिना डिका, भूताचा भाऊ, चंगू मंगू, सगळीकडे बोंबाबोंब इत्यादी मराठी तसेच सच्चा झूठा, फांदेबाज इत्यादी अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. चित्रपट, रंगभूमी, दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमातून भूमिका साकारलीय. तसेच काही जाहिरातींमध्ये कामे केली.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor viju khote movie sholay role kaliya ssj