‘जन गण मन…’ हे राष्ट्रगीताचे बोल कानावर पडताच सारे भारतीय स्तब्ध होतात आणि अभिमानाने गायन करू लागतात. अगदी सर्वसामान्य माणूस असो किंवा एखादा भारतीय सेलिब्रिटी असो, साऱ्यांचाच उर अभिमानाने भरून येतो. अशी एक घटना सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यासोबत झाले. जन गण मन चे सूर कानावर पडले आणि तिला आपले अश्रू अनावर झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना ऐश्वर्या राय-बच्चन भावूक झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात ऐश्वर्यासोबत शबाना आझमी, सोनू निगम सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. राष्ट्रगीत सुरू असताना नकळत ऐश्वर्याचे डोळे पाणावले आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ते अचूक टिपले.

भारतीय असल्याचा अभिमान असलेल्या ऐश्वर्याने या आधी २०१७मध्ये मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये राष्ट्रध्वज फडकवला होता. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये ध्वज फडकावणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress aishwarya rai gets emotional while listning to national anthem in public program