बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या सिनेसृष्टीपासून लांब आहे. मात्र तरीही ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिप असो किंवा तिने परिधान केलेले ड्रेस, तिची चालण्याची स्टाईल यामुळे अनेकदा तिला ट्रोल केले जाते. नुकतंच मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती Oops Moment ची शिकार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच मलायका अरोराचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ इंस्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यात ती एका गाडीतून उतरत असताना दिसत आहे. यावेळी तिने हाय हिल्स परिधान केल्या होत्या. यात ती गाडीतून उतरत असताना अचानक तिचा तोल बिघडतो आणि त्यात ती पडता पडता वाचते. यावेळी तिच्या मागे असलेला एक व्यक्ती तिला पकडतो त्यामुळे ती पडण्यापासून वाचते. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यानंतर ती थोडंस पुढे जाऊन फोटोग्राफर्सला पोज देते. यावेळी तिने काळ्या रंगाचा ट्यूब टॉप घातला आहे. त्यासोबत तिने हिरव्या रंगाचे वेलवेट जॅकेट परिधान केले आहे. त्यासोबत तिने न्यूड हिल्स आणि ब्लॅक सिलिंग बॅगही परिधान केल्याचे दिसत आहे. मलायकाचा हा लूक ख्रिसमस पार्टीसाठी असल्याचे बोललं जात आहे. एका पार्टीत सहभागी होण्यासाठी ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत करिश्मा कपूरच्या घरी पोहोचली होती.

“म्हातारपणात अशा हिल्स घालशील तर असेच होईल ना”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर “जर पडली असती तर फार बेइज्जती झाली असती,” असे एकाने म्हटले आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या तिला यावरुन ट्रोल केले जात आहे.

‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकल्यानंतर हरनाज संधूबद्दल गूगलवर नेटकऱ्यांनी सर्च केले ‘हे’ प्रश्न

मलायका ४७ वर्षांची असली तरी तिचा फिटनेस हा एका तरुणीसारखा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून इनस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मलायका या आधी सुद्धा तिच्या लूकसाठी अनेकदा ट्रोल झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress malaika arora gets brutally trolled after she trips in high heels video viral nrp