कलाविश्व म्हटलं की येथे सेलिब्रिटींच्या अफेअर, ब्रेकअपच्या चर्चा कायमच रंगत असतात. आतापर्यत कलाविश्वातील अनेक जोडप्यांचे अफेअरर्स आणि ब्रेकअप सोशल मीडियावर चांगलेच गाजले आहेत. यात संजीदा शेख- आमिर अली. ऋत्विक धन्जानी- आशा नेगी या सेलिब्रिटी कपलचे ब्रेकअप सर्वात जास्त चर्चेत राहिले. मात्र, या जोड्यांनंतर आणखी एक लोकप्रिय कपल विभक्त झालं आहे. तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी विभक्त झाली आहे.

‘प्रतिज्ञा’ या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा गौर आणि अभिनेता राज सिंह अरोरा हे विभक्त झाले आहेत. तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने ब्रेकअप केला आहे. याविषयी पूजाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.


“२०२० या वर्षात अनेक बदल पाहायला मिळाले. चांगलं होतं आणि नव्हतंही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या आणि राजच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगत होत्या. त्यामुळे याविषयी व्यक्त होण्यापूर्वी मला थोडा वेळ हवाय. राज आणि मी, आम्ही दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. भलेही यापुढे आमचे रस्ते वेगळे असतील. मात्र, आमच्यातील मैत्री, प्रेम कायम असेल. त्याचं सगळं चांगलं व्हावं ही एकच इच्छा माझी कायम असेल”,असं पूजा म्हणाली.

वाचा : भन्साळींच्या चित्रपटातून उलगडणार लाहोरच्या रेड लाईट एरियाचं सत्य?

पुढे की म्हणते, “यापुढेही आमच्यातली मैत्री कायम असेल आणि ती कधीच बदलणार नाही. याविषयी व्यक्त होण्यासाठी मला बराच वेळ आणि धैर्य लागलं. पण आता यापुढे मी काहीच बोलू शकत नाही. धन्यवाद”.

दरम्यान, २०१९ मध्ये पूजा आणि राज यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, या अफवा असल्याचं म्हणत पूजाने हे वृत्त फेटाळून लावलं होतं. पूजा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘सावधान इंडिया’, ‘एक नई उम्मीद – रोशनी’, ‘प्रतिज्ञा’ या सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर ‘केदारनाथ’ या चित्रपटात सारा अली खानच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.